Ride Worry Free With CEAT Puncture Safe* Tyres

आपल्या बाइकसाठी योग्य फिट निवडा

आपल्याला हवी तशी टायर साईझ मिळवण्यासाठी आपल्या वाहनाची घडण (मेक), मॉडेल आणि प्रकार निवडा.

हे टूल वापरताना, साइडवॉलवर छापलेले टायरचे माप आपण दोनवेळा तपासून घ्यावेत असे आम्ही सुचवतो. 

अनुभवा नवे तंत्रज्ञान

एक साधे टायर खिळ्यावरून जाते तेव्हा हवेची गळती होऊन पंक्चर होते, पण सीएट पंक्चर सेफ टायर्समधील सीलंट खिळा धरून ठेवतो आणि खिळा खेचून काढल्यावर भोकही बुजवतो. 

अनुभवा नवे तंत्रज्ञान  

एक साधे टायर खिळ्यावरून जाते तेव्हा हवेची गळती होऊन पंक्चर होते, पण सीएट पंक्चर सेफ टायर्समधील सीलंट खिळा धरून ठेवतो आणि खिळा खेचून काढल्यावर भोकही बुजवतो. 

USPs

Secure

संरक्षित

पंक्चरमुळे होणारी अनपेक्षित बिघाड नाही किंवा महागडी दुरुस्ती नाही

Secure

वेगवान

तत्काळ पंक्चर सील करतो, ज्यामुळे बाइक पंक्चरच्या दुकानात ढकलत नेण्याची गरज उरत नाही.

Secure

कामगिरी

टायरच्या क्षमतेवर आणि कामगिरीवर वेगाचा, अंतराचा आणि वेळेचा काहीही परिणाम होत नाही. 

Secure

सदाहरित

टायर टिकेपर्यंत कायमस्वरूपी सील

Secure

सदाहरित - टायर टिकेपर्यंत कायमस्वरूपी सील

Secure

सुरक्षित

पंक्चर सील करण्यात आणि गळती रोखण्यात उत्तम कामगिरी करणारा एक अनोखा उपाय

पंक्चर सेफ विरुद्ध इतर

इतर टायर्स सीएट पंक्चर सेफ

चपट होतात

जास्त किंमती

दीर्घकाळ कामगिरी

लिक्विड सीलंट

पर्यावरणाशी

सुसंगत

अस्वीकार : येथे दर्शवलेले दृश्य कल्पक चित्रण आहे आणि एका व्यावसायिकाद्वारे किंवा पर्यवेक्षणाखाली सादर करण्यात आले आहे. हे दृश्य किंवा तत्सम कोणतीही क्रिया पुन्हा निर्माण करण्याचा किंवा तिची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. केवळ खाचांमध्ये 2.5 मिमी पर्यंतचा व्यास असणाऱ्या खिळ्यांनी होणारे पंक्चर रोखू शकते. अधिक माहितीसाठी, कृपया www.ceat.com ला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

1. सीएट टायर्स पंक्चर सेफ कसे घडवले जातात?

सीएट पंक्चर सेफ टायर्स ट्युबलेस टायरच्या आतील बाजूस एक विशेष पेटंटप्राप्त सीलंट लावून घडवले जातात.

2. सीलंट कुठे लावला जातो?

सीलंट टायरच्या आतील बाजूस फक्त खाचांमध्ये लावला जातो. म्हणूनच, सीलंट फक्त टायरच्या खाचांमधील पंक्चर सील करू शकतो आणि साइडवॉल, टायर शोल्डर, इ. मधून होणारे पंक्चर सील करत नाही.

3. ह्या सीलंटने सर्व पंक्चर सील होतील का?

सीलंट केवळ खाचांवरील 2.5 मिमी व्यासापर्यंतच्या खिळ्यांनी होणारे पंक्चर रोखू शकतो.

4. पंक्चर सेफ टायर्स पॅकेजिंगमध्ये मिळतात का?

हो. ही टायर्स टायर आणि सीलंट सुरक्षित राहतील अशी पॅक केली जातात.

5. सीएट पंक्चर सेफ टायर्स ट्युबलेस टायर्स असतात की ट्युब टाइप टायर्स असतात?

सीएट पंक्चर सेफ टायर्स ही ट्युबलेस टायर्स असतात जी फक्त ट्युबलेस चाकांवरच बसवतात

6. सीएट पंक्चर सेफ टायर्स ट्युबटाइप चाकावर बसवता येतात का?

नाही. सीएट पंक्चर सेफ टायर्स केवळ ट्युबलेस चाकांवरच बसवता येतात.

7. सीएट पंक्चर सेफ टायर्स कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी उपलब्ध आहेत?

सध्या ही टायर्स फक्त निवडक बाइक मॉडेल्ससाठी उपलब्ध आहेत. आपल्या बाइकसाठी ती उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी, इथे क्लिक करा.

8. सीएट पंक्चर सेफ टायर्स कोणत्या मापाच्या टायर्ससाठी उपलब्ध आहेत?

सध्या ही टायर्स निवडक बाइक मॉडेल्ससाठी १० मापांमध्ये आणि साच्यांमध्ये खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध आहेत.

 

Puncture Safe Tyres Are Available In
Size Front/Rear Pattern
2.75-18 Front Gripp F
2.75-17 Front Gripp F
80/100-18 Front Secura Zoom F
2.75-18 Rear Milaze
3.00-18 Rear Milaze
3.00-17 Rear Milaze
80/100-18 Rear Secura Zoom, Gripp X3
80/100-17 Front Zoom X3 F
100/90-17 Rear Gripp X3
90/90-17 Front Zoom X3 F
100/80-17 Front Zoom Plus F
9. सीलंट काम कसा करतो?
 1. जेव्हा सामान्य ट्युबलेस टायर खिळ्यावरून जाते, तेव्हा खिळा टायरमध्ये घुसतो आणि हवेची गळती व पंक्चर होते.
 2. पण सीएट पंक्चर सेफ टायर्समधील सीलंट खिळा धरून ठेवतो आणि खिळा काढल्यानंतर भोकसुद्धा बुजवतो. ह्यामुळे टायरमधून हवेची गळती होत नाही. (टीप - सीलंट फक्त टायरच्या खाचांमधील पंक्चर सील करू शकतो आणि साइडवॉल, टायर शोल्डर, इ. मधून होणारे पंक्चर सील करत नाही. केवळ खाचांवरील 2.5 मिमी व्यासापर्यंतच्या खिळ्यांनी होणारे पंक्चर रोखू शकतो.)
10. ग्राहकाला मिळणारे प्रमुख फायदे कोणते?
 1. पैशाचे मूल्य
 2. वेळेचे मूल्य
 3. आयुष्यभरासाठीचे मूल्य
 4. सीएट पंक्चर सेफ टायर्सच्या सोबतीने कटकट मुक्त राइडचा आनंद घ्या..
11. पंक्चर सेफ टायर्स बसवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

a.   टायरला किंवा सीलंटला कोणताही अपाय होऊ नये म्हणून पॅकेजिंग बॉक्स काळजीपूर्वक उघडा.

b.   ब. टायर केवळ ट्युबलेस चाकावरच (रिमवर) बसवा. ट्युबटाइप चाकावर बसवू नका.

c.   ट्युबलेस टायरमधून गळती होऊ नये, ह्यासाठी टायरचे चाक (रिम) गंजलेले नसावे किंवा खराब नसावे..

d.   ड. ट्युबलेस चाकांमध्ये स्नॅप-इन टाइप व्हॉल्व असावेत.

e.   ई. टायर चढवण्यासाठी चढवणीचे वंगण (माऊंटिंग ल्युब) लावू नका.

f.    फ. टायर बसवताना त्यात पाणी शिरू देऊ नका. पाण्यामुळे सीलंट जेल खराब होऊ शकते.

g.   ग. सीलंट जेल बसवताना खराब झालेले नसावे किंवा बिघडवलेले नसावे.

h.   ह. टायरवर उभे राहू नका कारण त्यामुळे सीलंटच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

i.   टायर, चाक (रिम) आणि व्हॉल्व बसवताना ते गाडीत बसवण्यापूर्वी पाण्यात बुडवून हवेची गळती होते आहे का ह्याची आधी तपासणी करून घ्यावी.

12. पंक्चर सेफ टायर्स बसवल्यानंतर ग्राहकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

a.   आपल्या वाहन उत्पादकाने सुचविलेला हवेच्या फुगवट्याचा दबाव ठेवा.

b.   आपल्या गाडीवर जास्त भार देऊ नका.

c.   टायर कमी हवा भरलेले किंवा चपट असताना कधीही चालवू नका.

d.   महिन्यातून एकदा टायरमधील हवेचा दाब तपासा आणि हवेच्या दाबात कितीही छोटी घट झाली असेल तर ती भरून घ्या.

e.   आठवड्यातून एकदा टायर तपासा आणि त्यावर चिकटलेला कोणताही खिळा काढून घ्या.

f.    खिळा काढताना सीलंट गळला, तर खिळा पंक्चर झालेल्या ठिकाणी पुन्हा घुसवून १ मिनिटाने पुन्हा काढा. पंक्चर आपोआप सील व्हायला हवे.

13. पंक्चर सेफ बाइक टायर्सवर वॉरंटी मिळते का?

योग्य काळजी घेऊन, आपले सीएट पंक्चर सेफ टायर खूप काळ टिकायला हवे. आमच्या विशेष वॉरंटीच्या नियमांमुळेसुद्धा टायर्सबाबतीत काही अनपेक्षित समस्या उद्भवल्यास आपल्याला मदत होईल.

 1. उत्पादनातील बिघाडासाठीचा वॉरंटी कालावधी :*
  1. उत्पादनाच्या दिनांकापासून / वॉरंटी नोंदणीपासून ६ वर्षे किंवा ट्रेड वेअर इंडिकेटर्स (टीडब्ल्युआय) पर्यंत टायरची खाच झिजेपर्यंत, जे आधी होईल ते, किलोमीटर्स कितीही झाले असतील तरीही.
 2. उत्पादन व्यतिरिक्त बिघाडासाठीचा वॉरंटी कालावधी :*
  1. उत्पादनाच्या दिनांकापासून / वॉरंटी नोंदणीपासून ३ वर्षे किंवा १००% ट्रेड वेअर होईपर्यंत, जे आधी होईल ते, किलोमीटर्स कितीही झाले असतील तरीही.

(अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या www.ceat.com)

आपल्या जवळचा विक्रेता शोधा

कृपया विक्रेता शोधण्यासाठी आपला पिनकोड टाका.